![11sahkar.jpg11](https://navprabha.com/wp-content/uploads/2014/11/11sahkar.jpg11.jpg)
राष्ट्रीय अधिवेशनात विशेष गौरव
सहकार क्षेत्रात अर्थकारणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत दैदिप्यमान कार्य करणार्या व सेवा कार्याचाही वसा घेऊन ध्येयनिष्ठेने जबाबदारी सांभाळणार्या डिचोलीच्या दीनदयाळ सहकारी संस्थेला सहकार भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनात खास पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.गेली अठरा वर्षे ही संस्था सहकाराच्या माध्यमातून राज्यात सेवा कार्यातही आघाडीवर असून दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा, शिक्षण, सामाजिक उपक्रम, याचबरोबर गरजवंतांना मदतीचा हात देतानाच सामाजिक प्रबोधनाचेही कार्य करीत आहे. या कार्याची दखल घेऊन सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मराठे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष कांता पाटणेकर, उपाध्यक्ष वल्लभ साळकर, सर्व संचालक, अधिकारी, सागर पानवेलकर यांनी हा पुरस्कार नुकताच स्वीकारला.
संस्थेने २२,३३८ सदस्य असून भागभांडवल ३६ कोटी ६९ लाख आहे. संस्थेच्या राज्यात आठ शाखा असून यंदा संस्थेला १ कोटी ३३ लाख ५२ हजार रुपयांचा नफा झालेला आहे. संस्थेतर्फे भागधारकांना १२ टक्के लाभांश वितरित करण्यात आला असून ठेवी १०० कोटींच्या घरात असल्याचे अधिकारी श्री. पानवेलकर यांनी सांगितले.
संस्थेतर्फे सामाजिक क्षेत्रात गरजूंना मदत, शिक्षण, आरोग्यासाठी मदत सेवा कार्यासाठी सहकार्य, याशिवाय संस्थेचे स्वतंत्र सभागृह असून राष्ट्रीय व सामाजिक उपक्रमासाठी अल्प दरात ते उपलब्ध करण्यात येते. सहकार भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनात दीनदयाळ पतसंस्थेच्या कार्याचा खास गौरव करताना आदर्श संस्था म्हणून खास पुरस्काराने गौरव करण्यात आला.