दीड वर्षीय मुलीचा समुद्रात बुडून मृत्यू

0
15

खारीवाडा वास्को येथील एका दीड वर्षीय चिमुकल्या मुलीचा खारीवाडा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. वास्को पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खारीवाडा येथील किनाऱ्याजवळ राहणारी सदर मुलगी घराच्या बाहेर किनाऱ्यावर खेळत होती. खेळता खेळता अचानाक आईची नजर चुकवत ती समुद्राकडे गेली आणि पाण्यात गेल्यानंतर ती बुडायला लागली. लहान मुलगी समुद्रात बुडत असल्याचे तेथील लोकांना दिसून येताच त्यांनी त्वरित धाव घेऊन मुलीला पाण्यातून बाहेर काढले. प्रकृती गंभीर बनल्याने तिला त्वरित वास्कोतील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.