दीड कोटी पर्यटकसंख्येसाठी नियोजन

0
60

राज्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या दीड कोटीवर कशी न्यायची याचे नियोजन करण्याचे काम पर्यटन खात्यातर्फे चालू आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांनी दिली. सध्या राज्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या ६० लाख एवढी आहे. मात्र, राज्यातील वाढती साधनसुविधा व सरकारचे पर्यटन वाढीसाठीचे प्रयत्न याच्या बळावर येत्या काही वर्षांत ही संख्या दीड कोटीवर जाणार असल्याचे आजगावकर यांनी सांगितले.

पर्यटकांसाठीच्या साधनसुविधेत झपाट्याने वाढ करण्यात येत आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचे चार व सहापदरी महामार्गांत रूपांतर करण्याचे काम सध्या चालू आहे. मांडवी नदीवर तिसरा तर जुवारी नदीवर दुसरा पूल उभारण्याचे काम चालू आहे. रस्ते हे वाहतुकीसाठीची सर्वात महत्त्वाची साधनसुविधा आहे. मोप येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम चालू आहे. विविध किनार्‍यांवर शौचालये, पर्यटकांसाठी कपडे बदलण्याच्या खोल्या, पार्किंगची व्यवस्था, पथदीप बसवण्यात आले आहेत. तर बर्‍याच किनार्‍यांवर ही सुविधा उभारण्याचे काम चालू आहे.
राज्यात तारांकीत हॉटेल्सची संख्याही वाढणार आहे. पर्यटकांसाठी खोल्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.