मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती
दिव्यांग सबलीकरण खाते हे नवे खाते येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती काल समाजकल्याण खात्याचेमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. एकदा हे खाते स्थापन झाले की दिव्यांगांच्या सबलीकरणासाठीचे सगळे काम हे खाते करणार असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
भारतातील महाराष्ट्र ह्या एकाच राज्यात दिव्यांग सबलीकरण खाते आहे. आता ह्या खात्याची स्थापना करणारे गोवा हे देशातील दुसरे राज्य ठरणार असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. पुढील वर्षी पर्पल फेस्टची जबाबदारीही दिव्यांग सबलीकरण खात्याकडेच असेल, अशी माहिती देखील फळदेसाई यांनी दिली.
समाजकल्याण खाते हे दिव्यांगांसाठीच्या सबलीकरणाचे काम करीत असले, तरी ह्या खात्याकडे अन्य कामेही असतात. दुर्बल घटकांसाठीच्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना यांचेही काम समाजकल्याण खाते सांभाळत असते. हे सगळे काम करतानाच ह्या खात्याला दिव्यांगांच्या सबलीकरणासाठीचे कामही करावे लागते. मात्र, एकदा दिव्यांग सबलीकरण खाते स्थापन झाले की त्यांच्या सबलीकरणासंबंधीची सगळी कामे तेच खाते पाहणार असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्यांसाठींचे कोणतेही विद्यालय आता दिव्यांगांना प्रवेश नाकारू शकत नाही, असे सांगून नव्या शैक्षणिक धोरणात तसे स्पष्ट करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.