दिवाळीच्या स्वागतासाठी गोमंतकीय सज्ज झाले आहेत. दिवाळीनिमित्त घरोघरी रांगोळी, आकाशकंदील, चांदण्या आणि विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. पहाटे रात्री नरकासूराच्या दहनानंतर अभ्यंग्यस्नान केल्यानंतर दिवाळीला खर्या अर्थाने सुृरूवात होणार आहे. उद्या १९ रोजी लक्ष्मीपूजन, २० रोजी पाडवा, २१ रोजी भाऊबीज असे कार्यक्रम साजरे केले जातील.
राज्यातील विविध भागातील मार्केटमध्ये काल दिवाळीनिमित्त विविध प्रकारच्या सामानाच्या खरेदीसाठी गर्दी उसळली होती. पोहे, मिठाई व पदार्थ विक्रीच्या दुकानांमध्ये गर्दी होती. पणजी तसेच राज्यातील प्रमुख शहरांत नरकासूरप्रतिमा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात नरकासूराच्या प्रतिमा उभारून रात्र जागवून पहाटे त्याचे दहन करण्यात आले. यंदा परतीच्या पावसामुळे नरकासूर प्रतिमा बनविण्याच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, नरकचतुर्थीच्या दिवशी पावसाने उसंत घेतल्याने युवा वर्गाने सुस्कारा सोडला.