दिल्ली विमानतळाचे छत कोसळून 1 ठार

0
9

राजधानी दिल्लीत गुरुवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 येथील छत कोसळून एकाचा मृत्यू, तर तीनजण जखमी झाल्याची माहिती दिल्ली अग्निशामक विभागाकडून देण्यात आली. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या टर्मिनलवरून होणारे सर्व उड्डाण पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आले आहेत.