दिल्लीत नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सोमवारपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, काल दिल्ली सरकारने कॅगचा अहवाल विधानसभेत सादर केला. या अहवालात ‘आप’ सरकारच्या कारभाराच्या संदर्भात मोठा खुलासा करण्यात आला आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत असताना मद्य धोरणाच्या अंमलबजावणीमुळे तब्बल 2002 कोटींचा महसूल बुडाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.