दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ स्वबळावर

0
3

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल रविवारी आम आदमी पक्ष (आप) दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस पक्षासोबत युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी रोजी संपत आहे. म्हणजे पुढील वर्षी जानेवारीत कधीही विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर श्री. केजरीवाल बोलत होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेस हे विरोधी पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत. दोघांनी दिल्लीत एकत्र लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, यात दोन्ही पक्षांना एकही जागा मिळाली नाही. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचा करार होऊ शकला नाही. त्यानंतर दोघांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली.

शनिवारी पदयात्रेदरम्यान त्यांच्यावर पाणी फेकल्याच्या घटनेसाठी केजरीवाल यांनी भाजप आणि गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरले आहे. मद्य धोरण प्रकरणात 13 सप्टेंबर रोजी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 21 सप्टेंबर रोजी अतिशी यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. केजरीवाल ऑक्टोबरपासून दिल्लीत पदयात्रेवर आहेत.