दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (शनिवार, दि. 8) जाहीर होणार आहे. बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल्स) दिल्लीत आम आदमी पक्षाला (आप) सत्ता राखणे कठीण जाईल, असे भाकीत वर्तवले. 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपचे सरकार येण्याची अपेक्षा आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागा असून, बहुमताचा आकडा 36 एवढा आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस हे तीनही पक्ष संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले होते. 70 जागांसाठी एकूण 57.85 टक्के मतदानाची नोंद झाली होती.
केंद्रात सत्ता असूनही दोन वेळा दिल्लीत पराभव सहन करावा लागल्यानंतर यावेळी भाजपला सत्ता मिळणार असल्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.