येथील संसद संकुल परिसरात काल दुपारी भीषण आग लावली. मात्र या आगीत जीवितहानीचे वृत्त नाही. रविवार असल्याने या परिसरात सुरक्षा रक्षकांविना अन्य कोणीच नसल्याने अनर्थ टळला. संसदेच्या गेट क्र. ५ जवळील शीतगृहाजवळ ही आग प्रथम लागली. अग्नीशामक दलाच्या दहा बंबांनी ही आग नियंत्रणात आणली. शीतगृहाच्या ठिकाणी वेल्डिंग कामावेळी ही आग लागली. आगीचा प्रकार निष्काळजीपणामुळे घडण्याचा दावा दिल्ली अग्नीशामक दलाचे प्रमुख ए. के. शर्मा यांनी केला आहे.