दिल्लीतील अलिपूर भागात शुक्रवारी दुपारी बांधकाम सुरू असलेल्या गोदामाची भिंत कोसळून पाच जण ठार, तर आठ जण जखमी झाले. ढिगार्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून शोध मोहीम सुरू आहे. भिंत कोसळलेले गोदाम ५ हजार चौरस फुटांचे आहे. हे बांधकाम बेकायदा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.