दिल्लीत बेबी केअर सेंटरला आग, 7 बालकांचा मृत्यू

0
6

गुजरातमधील राजकोटनंतर राजधानी दिल्लीतही शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील न्यू बॉर्न बेबी केअर सेंटरला लागलेल्या आगीत सात नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रविवारी पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. रात्री साडेअकराच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे 4 च्या सुमारास आटोक्यात आली. दरम्यान, या दुर्घटनेत सापडलेल्या पाच अर्भकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यातील एका अर्भकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या आगीच्या कारणाचा शोध सुरू असून रुग्णालयाला देण्यात आलेल्या परवानग्यांचीही चौकशी आता केली जात आहे.यी बोलताना, येत्या 5 वर्षात देशात यूसीसी लागू करण्यात येणार आहे. देशात सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातील असे सांगितले.