पूर्व दिल्लीतील शाकारपूर भागामध्ये संशयास्पदरीत्या फिरणार्या पाच जणांना काल अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना हटकल्यावर त्यांनी गोळीबार केला, तेव्हा चकमकीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यापैकी काहींचा दहशतवादी गटांशी संबंध असल्याचा संशय आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे पंजाबमधील असून तिघे काश्मीरचे आहेत. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रेही सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ते दिल्लीत कोणत्या उद्देशाने आले होते याची चौकशी केली जात आहे.