दिल्लीतील चोरट्यास मांद्रे येथे अटक

0
156

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने दिल्लीतील अट्टल चोरट्याला आगरवाडा मांद्रे येथील एका गेस्ट हाउसमध्ये काल अटक केली असून त्याच्याकडून ५ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. संशयित मुकेश शर्मा (३४) याचा १४ चोर्‍यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. त्याच्याकडे चार मंगळसूत्र, ३ सोन साखळ्या, १ लॉकेट अशा सोन्याचा ऐवज आढळून आला आहे.