दिल्लीचे वादग्रस्त राज्यपाल नजीब जंग यांचा राजीनामा

0
99

नवी दिल्लीचे वादग्रस्त ठरलेले नायब राज्यपाल नजीब जंग यांनी काल राज्यपालपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांचा सतत वाद झडला होता. काल जंग यांनी आपला राजीनामा केंद्र सरकारला सादर केला. जंग यांचा कार्यकाळ संपण्यास अद्याप दीड वर्ष आहे, तरीही त्यांनी राजीनामा दिला आहे.