सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट होऊन झालेल्या या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी काल रविवार १ रोजी दुपारी अचानक स्फोट झाला. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासनाकडून घोषित कऱण्यात आली आहे.