दामोदर मावजो यांचेपुन्हा वादग्रस्त वक्तव्य

0
8

केंद्र सरकारने गुरुवारी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला. या निर्णयाबद्दल मराठीप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कोकणी साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर यांनी काल पुन्हा एकदा काहीसे वादग्रस्त विधान केले.
विकषित भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देणे म्हणजे उरलेल्या भाषांना कमी लेखणे असे माझे ठाम मत आहे, अशी प्रतिक्रिया दामोदर मावजो यांनी दिली. अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने स्पृश्य-अस्पृश्यता वाढीस लागेल, असे सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास उशीर झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.