केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना प्रवेशद्वारावर बनावट विमान तिकीट दाखवून विमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या एका रशियन महिलेला दाबोळी विमानतळ पोलिसांनी अटक केली. संशयित मरिना एकटेरिना या रशियन महिलेने अझूर एअर फ्लाइटचे फोटोशॉप केलेले तिकीट दाखवून विमानतळ टर्मिनल इमारतीत प्रवेश केला. या प्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.