दाबोळी विमानतळावर एका 21 वर्षीय युवकाकडे जिवंत काडतूस आढळल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन अटक केली. इंडिगोच्या विमानातून मुंबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या खामगाव-बुलढाणा येथील निकेत अनुपकुमार ताओरी याची दाबोळी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करण्यात आली. यावेळी मेटल डिटेक्टरमध्ये त्याच्या बॅगमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचे आढळून आले.