दहा पाक सैनिकांचा बीएसएफकडून खात्मा

0
219

सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय सैनिकांना लक्ष्य करणार्‍या पाकिस्तानी लष्कराला गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जबरदस्त दणका दिला. भारतीय जवानांनी पाकिस्तानी रेंजर्सच्या बंकर्सचा अचूक वेध घेत त्यांच्या दिशेने तुफान गोळीबार करीत दहा पाक सैनिकांचा खात्मा केला. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉंस्टेबल आर. पी. हाजरा शहीद झाले होते. त्याचा बदला काल सीमा सुरक्षा दलाने घेतला. भारतीय जवानांनी केलेल्या या कारवाईमुळे पाक सैनिकांच्या बंकर्सजवळील सोलर पॅनल्स व अन्य शस्त्रे यांची तसेच बंकर्सचीही मोठी हानी झाली असल्याची माहिती बीएसएफचे महासंचालक रामावतार यांनी दिली. पाकिस्तानने गेल्या वर्षी ८०० हून जास्त वेळा शस्त्रसंधी उल्लंघन केल्याची नोंद आहे. नव्या वर्षातही हे प्रकार सुरू झाले आहेत. २३ डिसेंबर रोजी अशाच एका उल्लंघनावेळी ३ भारतीय जवान शहीद झाले होते.