गोव शालान्त मंडळाने यंदा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याची सोय केलेली आहे. ती चांगली असली तरी या अर्जात विद्यार्थ्यांच्या वडिलांचे नाव भरण्यासाठी जी जागा ठेवण्यात आलेली आहे ती खूपच कमी असल्याने विद्यार्थ्यांपुढे समस्या निर्माण झालेली आहे, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला. डिमेलो म्हणाले की, काही विद्यार्थ्यांच्या वडिलांची नावे विशेष करून ख्रिस्ती विद्यार्थ्यांच्या वडिलांची नावे आकाराने मोठी असल्याने त्यांना हे ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी येणार आहेत. यासंबंधी काही विद्यालयानी व पालकांनीही गोवा शालांत मंडळाकडे तक्रारी केलेल्या असून वडिलाचे नाव लिहिण्यासाठीची जी जागा आहे तीत वाढ करण्याची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.