दहावी पूर्व व्यावसायिक शाखा बंदचा निर्णय

0
7

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून दहावी पूर्व व्यावसायिक शाखा (प्री व्होकेशनल) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंडळाने राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांना एका परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. दहावीच्या पूर्व व्यावसायिक शाखेतील विषयांचा अंतर्भाव कौशल्य आधारित विषय योजनेमध्ये (एनएसक्यूएफ) केला असून, त्याची कार्यवाही शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून केली जाणार आहे. तथापि, पूर्व व्यावसायिक विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना येत्या मार्च 2024 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेला बसण्याची मुभा दिली जाणार आहे, असे मंडळाने जाहीर केले आहे.