गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च 2025 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दि. 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळातर्फे दहावीची परीक्षा 1 मार्च ते 21 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली होती. ही परीक्षा राज्यातील एकूण 32 केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेला नियमित प्रवर्गातून 18,838 विद्यार्थी बसले होते. दहावीचा निकाल गोवा बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाईल.

