दहावीचा निकाल आज होणार जाहीर

0
94

गोवा शालांत मंडळाने गेल्या एप्रिल महिन्यात घेतलेल्या दहावेीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवार, दि. 15) सायंकाळी 5.30 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. यावर्षी 19 हजार 556 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. बुधवारी शालांत मंडळाच्या पर्वरी येथील कार्यालयातील परिषदगृहात हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये हे हा निकाल जाहीर करतील. यानंतर मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होणार आहे. गेल्या एप्रिल महिन्यात एकूण 31 केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 9 हजार 743 मुले व 9 हजार 14 मुलींनी ही परीक्षा दिली होती. याशिवाय 242 अनुत्तीर्ण आणि 385 खासगी आयटीआय विद्यार्थी परीक्षेला बसले होते. कोविड महामारीमुळे मागील तीन वर्षे ही परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आली होती. मात्र, यंदा पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षेची पद्धत सुरू झाली.