जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर दहशतवादी हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिले जात असल्याने दहशतवाद्यांचे मनोबल खचले असल्याने ते पुन:पुन्हा हल्ले चढवत असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. काल सकाळी सांबा जिल्ह्यातील जम्मू-पठाणकोट मार्गावरील लष्कराच्या छावणीवर हल्ला केलेल्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची माहितीही संरक्षणमंत्र्यांनी दिली. भारतीय सुरक्षा दर सीमावर्ती भागात सातत्याने गस्त घालते. मात्र, या भागात अनेक नाले असल्याने संपूर्ण प्रदेशाची छाननी करणे शक्य होत नाही असे पर्रीकर म्हणाले.