दहशतवादाच्या आश्रयदात्यांविरोधातही भारत

0
85

>> ‘हार्ट ऑफ एशिया’त पंतप्रधान मोदींकडून पाकला इशारा

 

येथे आयोजिण्यात आलेल्या हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे जोरदार हल्लाबोल केला. आम्ही केवळ दहशतवाद्यांच्याच विरोधात नसून दहशतवादी कारवायांना पाठबळ देणार्‍यांच्याही विरोध आहोत असे मोदी यांनी यावेळी ठणकावले. तसेच अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताचे पाठबळ मिळेल अशी ग्वाहीही मोदी यांनी यावेळी दिली.
या परिषदेत पाकसह ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दहशतवाद हाच या परिषदेचा मुख्य विषय असेल. विशेष म्हणजे पाकविरोधात दहशतवाद्याच्या मुद्द्यावर भारत-अफगाणिस्तानचे एकमत झाले आहे.
दहशतवाद व कट्टरपंथीय विचारसरणीमुळे अफगाणिस्तानच्या शांतता व स्थैर्याला गंभीर धोका आहे. दहशतवाद पसरवणार्‍या व रक्तपात करणार्‍यांविरुध्द दोन हात करण्यासाठी अफगाणिस्तानच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. अफगाणिस्ताना शांतत व स्थैर्य निर्माण व्हावे हा हार्ट ऑफ एशिया परिषदेचा हेतू असल्याचे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
अफगाणिस्तानला दहशतवादापासून मोठा धोका आहे. बाह्य धोक्यांपासून अफगाणिस्तान व अफगाणिस्तानी जनतेच्या रक्षणासाठी आम्ही सक्षम आहोत. अफगाणिस्तान व अन्य देशांदरम्यान संपर्क वाढवा ही सर्वच देशांची जबाबदारी आहे. अफगाणिस्तानमधील लोकशाही टिकून राहण्यासाठीच आम्ही तेथील संसद इमारतीची उभारणी केली. याकडेही मोदी यानी लक्ष वेधले. या परिषदेत पाकचे प्रतिनिधित्व पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझिज करत आहेत.
काल सकाळी ११ वा. या परिषदेचे पंतप्रधान मोदी व अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.