दहशतवादविरोधी पोलीस ताफ्याची स्थापना

0
77

प्रत्येक पोलीस स्थानकात महिला कक्ष

दहशतवादाच्या बाबतीत सर्वांनाच सतर्क राहावे लागते. या पार्श्‍वभूमीवर सरकारने ११० पोलिसांचा ताफा असलेले दहशतवादविरोधी पथक स्थापन केल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.प्रत्येक पोलीस स्थानकात महिला कक्ष
महिलांवर होणार्‍या अत्याचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकावर महिला पोलीस कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी ३०० महिला पोलिसांची भरती करण्यास सरकारने मान्यता दिल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. वरील ३०० पोलिसांमध्ये ७१ पोलीस उपनिरीक्षक व २२१ पोलीस शिपाईंचा समावेश असेल.
ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी येत्या १९ डिसेंबर रोजी ‘हेल्प लाईन’ स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.