वास्को (न. प्र.)
गुरूवारी साजरा होणार्या दसरोत्सवानिमित्त वास्को शहरात झेंडू फुलांनी मार्केट सजून गेले आहे. वर्षपद्धतीप्रमाणे परप्रांतिय झेडूंची फुले विक्री करण्यास दाखल झाले आहेत. वर्षपद्धतीप्रमाणे हिंदूंचा आवडता सण विजयादशमी म्हणजेच दसरोत्सव गुरूवारी साजरा होणार असून सध्या नवरात्रोत्सवाची धूम सगळीकडे चालू आहे. दसरोत्सव साजरा करून या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान दसरा सणाला लागणार्या झेडूंची फुले वास्को शहरात उपलब्ध झाली असून हुबळी, बेळगाव, बेंगलोर आदी भागातून व्यापारी सदर झेंडूच्या फुलांचा बाजार थाटून विक्री करत आहेत. ४० रुपये ८० रुपये किलो अशा दराने झेंडूंची फुले विकली जातात. दरम्यान दसरा सणाला झेंडूंच्या फुलांची मागणी जास्त असल्याने याची आवक वाढली आहे. सदर फुले घेण्यासाठी ग्राहकांची तसेच वाहन-चालकांची गर्दी दिसत आहे.फोटो १६ दसरा.