दंगलीनंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता

0
3

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीच्या प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यात नागपूरमध्ये सोमवारी रात्री औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल झाल्याची घटना घडली. नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली. या घटनेत काही पोलीस देखील जखमी झाले. या घटनेमुळे नागपूरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. सध्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटात संघर्ष पेटल्याने तणाव निर्माण झाला होता. जमाव नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यासह सौम्य लाठीमारही करावा लागला. तसेच रात्री उशिरापर्यंत पोलिसांची असामाजिक तत्त्वांची धरपकड सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सुनियोजित कट दिसून येत असल्याचे मोठे विधान केले.