थाळीफेकपटू कमलप्रीत ऑलिम्पिकसाठी पात्र

0
169

भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौर हिने ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. ऍथलेटिक फेडरेशन कप स्पर्धेत कौरने ६५.०६ मीटर अंतरावर थाळी फेकली. ऑलिम्पिक पात्रतेसाठीचा ६३.५ मीटरचा निकष तिने सहज पार केला. रेल्वेच्या २५ वर्षीय कौरने आपल्या कामगिरीसह नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करताना कृष्णा पूनिया (६४.७६ मीटर, वर्षे २०१२) हिचा विक्रम मोडला. भारतीय थाळीफेकच्या इतिहासात महिलेने ६५ मीटरचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.