थापा, सरिता देवी उपांत्य फेरीत

0
117

पाच वेळची विश्व विजेती एमसी मेरीकॉम, शिव थापा आणि एल. सरिता देवी यांनी काल मंगळवारी संघर्षपूर्ण लढतींत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

१२व्या मानांकित मेरीकॉमने बीना देवीला ५-० असे एकतर्फी पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. थापाने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात उज्बेकिस्तानच्या शेरबेक राखमातुलीव तर केली. आता उपांत्य फेरीत त्याची लढत भारताच्याच मनीष कौशिकशी होईल. मनिषने उपांत्यपूर्व लढतीत फिलिपिन्सच्या चार्ली सुआरेजवर मात करीत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविले.

दरम्यान, भारताच्या अमित फंगलने ४९ किलो वजनी गटात कॅमरूनच्या सिम्पलाइस फोटसालवर ५ -० अशी एकतर्फी मात केली. आता पुढील फेरीत त्याची गाठ भारताच्याच लालबियाकीमा नुतलाई याच्याशी पडेल.

महिलांच्या ६० किलो वजनी गटात भारताच्या एल. सरिता देवीने थायलंडच्या पीएमविलाई लाओपीमवर ४-१ अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तिची गाठ भारताच्याच प्रियंका चौधरीशी पडेल. प्रियंकाने इंडोनेशियाच्या हुसवातुन सनबायवर ५ -० अशी मात करीत अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविले. अन्य एका लढतीत भारताच्या स्वीटी बूराने ७५ किलो वजनी गटात नेपालच्या सरस्वती राणावर सहज मात केली. तर सशी चोप्राने व्हाय संध्याराणीला पराभूत करीत पुढील फेरी गाठली.