थकबाकीच्या मागणीसाठी आज कदंब कर्मचार्‍यांची सभा

0
89

सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी व तीन वर्षांचा बोनस द्यावा या मागणीसाठी पणजी, मडगाव, वास्को व पर्वरी या चारही डेपोतील कर्मचारी आज २४ रोजी ११ वा. पणजीत जमणार असून संध्याकाळी ३.३० वा. कदंब बसस्थानकावर सभा होणार असल्याचे कदंब कामगार संघटनेचे अध्यक्ष जोकिम फर्नांडिस यांनी सांगितले. सभेला सुमारे ५०० ते ६०० कर्मचारी असतील. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी चार हप्त्यात देण्याचे आश्‍वासन सरकारने दिले होते. पण अद्याप एकही हप्ता देण्यात आला नसल्याचे फर्नांडिस म्हणाले. कदंब कर्मचार्‍यांना आता महिन्याचा पगारही उशीरा म्हणजे महिन्याच्या १५ तारखेच्या आसपास मिळत असतो. त्यामुळे कर्मचार्‍यांचे हाल होतात. पूर्वी पगार ७ तारखेपर्यंत मिळायचा अशी माहितीही फर्नांडिस यांनी दिली.