थंडीमुळे दिल्ली येथे 6 जणांचा मृत्यू

0
19

काल रविवारी 14 जानेवारी रोजी सकाळी दिल्लीत शेकोटी पेटवून झोपलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 4 जण एकाच कुटुंबातील आहेत. दिल्लीतील विविध भागांत थंडीपासून वाचण्यासाठी खोलीत शेकोटी पेटवून झोपलेल्या 6 जणांचा मृत्यू झाला. उत्तर दिल्लीच्या खेडा भागात घराच्या खोलीत पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. ही शेकोटी खोलीत पेटवलेली होती. त्याच वेळी, पश्चिम दिल्लीतील इंद्रपुरी भागात दोन लोक घरात बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाचवता आले नाही. त्यांच्याही खोलीत शेकोटी जळत होती. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असून अनेक भागांत शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. किमान तापमान 3.5 अंश सेल्सियस होते. धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या 22 रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. सकाळी 4.30 ते 7 या वेळेत 7 फ्लाइट जयपूर आणि एक फ्लाइट मुंबईकडे वळवण्यात आली. चेन्नईत तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणेही वळवण्यात आली.