‘त्या’ ६० गोमंतकीय खलाशांची होम क्वॉरंटाईनसाठी पाठवणी

0
173

 

मारेला डिस्कव्हरी या जहाजावरून विदेशातून गोव्यात आलेल्या ६० गोमंतकीय खलाशांचे १४ दिवसांचे सरकारी क्वारंटाईन पूर्ण झाल्याने त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मारेला या जहाजावरील ६० खलाशांना मुंबई बंदरात उतरवून त्यांची कोविड चाचणी केल्यानंतर गोव्यात प्रवेश देण्यात आला होता. पाटो – पणजी येथील एका हॉटेलमध्ये त्या खलाशांना सरकारी क्वारंटाईनखाली ठेवण्यात आले होते. सरकारी क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर त्या गोमंतकीय खलाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांची घरी रवानगी करण्यात आली असून त्यांना २५ मे पर्यंत घरात राहावे लागणार आहे.