‘त्या’ शिक्षकाच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांनी वाढ

0
4

अनेकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणात अटक केलेल्या योगेश शेणवी कुंकळीकर या शिक्षकाला न्यायालयाने आणखी 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश काल दिला. दरम्यान, दीपश्री सावंत व श्रुती प्रभूगावकंर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे.