‘त्या’ वृत्ताने बाजारातील हिरवे वाटाणे गायब!

0
251

मडगाव (न. प्र.)
गांधी मार्केटातील हिरवे वाटाणे (ग्रीनपीस) मध्ये हिरवा रंग मिसळून विकत असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ माजली. कित्येकांनी गांधी मार्केटात जाऊन फळभाजी विक्रेत्यांना जावून जाब विचारला. वर्तमानपत्रात वृत्त येताच गांधी मार्केटातील वाटाणे, फळभाज्या विक्रेत्यांनी गायब केले. कित्येकांनी या व्यापार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पालिकेत जावून केली. काल एफडीएच्या कचेरीत फोन करून त्यासंबंधी विचारता कोणीही अधिकारी उपस्थित नव्हता. एफडीएच्या अधिकार्‍यांनी त्याच्याकडे असलेल्या भाज्यांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. आके पांडवा कपेलजवळ हिरवे वाटाणे विकण्यात येत असून त्या फळभाज्या विक्रेत्यांच्या भाज्यांची तपासणी करण्याची मागणी महम्मद शाह याने केली आहे.
तसेच नवरात्री व नंतर दीपावली असल्याने पुरोहित व इतर खाद्यपदार्थ दुकानातील खाद्य पदार्थांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दुधाच्या माव्यात भेसळ असण्याची शक्यता आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे.