‘त्या’ वक्तव्यप्रकरणी सरदेसाईंकडून दिलगिरी

0
10

आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधानसभेत ‘कुठली मराठी?’ असे वक्तव्य करून मराठीप्रेमांच्या भावना दुखावल्या प्रकरणी अखेर काल दिलगिरी व्यक्त केली. आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत वीजमंत्री सुदिन ढवळीकरांशी चर्चेवेळी ‘कुठली मराठी?’ असे वक्तव्य करून मराठी भाषाप्रेमींच्या भावना दुखावल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यांचा राज्यभरात मराठीप्रेमींकडून निषेध केला जात होता. त्यामुळे सरदेसाई यांनी मंगळवारी विधानसभेत कायदा खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना आपण केलेल्या वक्तव्याबाबत मराठीप्रेमींची माफी मागितली.