‘त्या’ मुलाखतीसाठी  दोषीला ४० हजार

0
71

दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या मुकेश सिंहच्या मुलाखतीसाठी ४० हजार रुपये देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तिहार कारागृहाच्या चौकशीत ही गोष्ट उघड झाली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणावर डॉक्युमेंट्री बनवणार्‍या लेज्ली उडविनच्या कंपनीने दोषी मुकेशला हे पैसे मोजल्याची माहिती मिळाली आहे. मुकेश व त्यांच्या कुटुंबीयांनी दोन लाखांची मागणी केली होती. मात्र, ४० हजारांवर हा सौदा पक्का झाल्याची माहिती कारागृहाच्या सूत्रांनी दिली.