राज्यातील जुन्या व दुरावस्थेत असलेल्या मंदिरांच्या दुरुस्तीचे व नूतनीकरणाचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने सरकारने प्राथमिक स्वरुपातील प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पुरातत्त्व खात्यातर्फे त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सावंत यांनी नमूद केले.
यावर्षीच्या अंदाजपत्रकात या कामासाठी २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील विविध भागांत आणि विशेषकरून ग्रामीण भागांत कित्येक छोटी-मोठी भग्नावस्थेतील मंदिरे असून, या जुन्या मंदिरांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पोर्तुगीज राजवटीत ही मंदिरे पाडून नष्ट करण्याचा कट रचण्यात आला होता, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने या मंदिरांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तो निधी या मंदिरांच्या पुनर्बांधणीवर व देखभालीवर खर्च करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.