जम्मू काश्मीरमधल्या नगरोटा येथे झालेल्या चकमकीत गुरूवारी भारतीय जवानांनी पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांची मोठा हल्ला करण्याची तयारी होती. तशाच तयारीने ते भारतात आले होते मात्र आमच्या सुरक्षादलाच्या जवानांनी त्यांचे मनसुबे धुळीला मिळवल्याचे मोदींनी सांगितले.
या चार दहशतवाद्यांना गुरूवारी ठार केले होते. त्यानंतर त्यांच्याजवळ असलेला मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. हे पाहून हे चारही दहशतवादी हे दहशतवाद पसरवण्यासाठी आले होते हे स्पष्ट झाले असल्याचे मोदींनी म्हटले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर यंत्रणेतील प्रमुक अधिकारी यांची नगरोटा चकमकीबाबत महत्वाची बैठक घेतली.