‘त्या’ जलसफरी बोटीचा परवाना 3 वर्षांसाठी रद्द

0
3

कळंगुट येथे जलसफरीच्या वेळी समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या मीना कुतिन्हो यांच्या बोटीचा परवाना तीन वर्षांसाठी रद्द करण्यात आला आहे. पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. कळंगुट येथील बोट दुर्घटनेमध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता, तर 20 पर्यटक जखमी झाले होते.