सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीशी संबंधित खटल्याच्या सुनावणीपासून स्वतः माघार घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी 6 जानेवारीपासून सुरू होणार असून, त्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्यात येणार आहे. 2 मार्च 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती तीन सदस्यीय पॅनेलद्वारे केली जाईल. त्यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश असेल. मात्र 21 डिसेंबर 2023 रोजी मोदी सरकारने अध्यादेश आणत सरन्यायाधीशांना पॅनेलमधून काढून त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री नियुक्त केला होता. या निर्णयाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्या जया ठाकूर यांनी याचिका दाखल केली आहे.