‘त्या’ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश

0
6

वेर्णा येथील सिप्ला या औषध निर्मिती कंपनीत मशीनची दुरुस्ती करताना अक्षय पवार व अक्षय पाटील या दोन कामगारांचा गुदमरुन मृत्यूमुखी पडल्याची जी घटना घडली, त्या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश कारखाने व बाष्पक खात्याला देण्यात आले असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत सांगितले. शून्य तासाला आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. मृतांच्या कुटुंबीयांना सरकार नुकसानभरपाई देणार असून, सदर कंपनीलाही नुकसानभरपाई देण्याची सूचना करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मृत युवक हे एन. जे. रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लिमिटेडचे कर्मचारी असून, सिप्ला कंपनीत मशीन दुरुस्ती काम करताना गुरुवारी त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.