तोफेच्या सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू

0
3

तोफेच्या सरावादरम्यान बॉम्बचा स्फोट होऊन दोन जवानांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना राजस्थानमधील बीकानेर येथे घडली. बीकानेर येथील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये ही घटना घडलेल्या या घनेत एक जवान गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात महाजन फिल्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमध्ये चार्ली सेंटर येथे झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका जवानाला सूरतगड येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले आहे.