मोसादच्या कार्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असणारे युद्ध आता आणखी हिंसक आणि उग्र होत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करा, असा इशारा नागरिकांना दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करण्याची गरज आहे. अणुकरारावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणाचा आहे. इराणने या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती. इराणकडे अण्वस्त्रे असता नयेत. असे म्हटले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आता अमेरिकाही युद्धात उतरण्याची भीती व्यक्त होत आहे.
आता इस्रायलने इराणला आणखी एक धक्का देताना इस्रायली सैन्याने मंगळवारी इराणच्या सशस्त्र पथकांचा नवनियुक्त चीफ ऑफ स्टाफ आणि वरिष्ठ सैन्य कमांडर अली शादमानी यांना संपवल्याचा दावा केला आहे. पाच दिवसात दुसऱ्यांदा युद्धकाळातील इराणच्या चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाला आहे. शादमानी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे सैन्य सल्लागार होते.
मोंसादच्या कार्यालयावर हल्ला
इराणने इस्त्रायलच्या गुप्तचर यंत्रणा मुख्यालयावरच हल्ला केला आहे. इस्रायलकडून इराणमधील अणवस्त्र तळ, सैन्य ठिकाणे आणि बड्या लष्करी अधिकाऱ्यांना संपवण्यास सुरूवात केल्यानंतर आता इराणने देखील इस्त्रायलला चोख उत्तर दिले. आता इराणने थेट ‘मोसाद’वर हल्ला केला आहे. इस्त्राइयची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ला इराणने लक्ष केले. या हल्ल्यात ‘मोसाद’ पूर्णपणे उद्धवस्त केल्याचा दावा इराणे केला आहे.
पाकिस्तानची इराणला मदत?
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असताना, पाकिस्तानकडून इराणला शाहीन-3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्याची तयारी सुरू असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इराणला त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे.
खोमेनींची हत्याच हे
युद्ध संपवेल ः नेतन्याहू
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्याच हे युद्ध संपवेल असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे.