तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा करून 35 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तेलंगणा विधानसभेचे एकूण संख्याबळ 119 इतके असून 30 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या यादीत ज्युबिली हिल मतदारसंघात एल. दीपक रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांची लढत पूर्वाश्रमीचे क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे उमेदवार अझरुद्दीन यांच्याशी होईल. सिनेस्टार पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत भाजप आघाडी करण्याची शक्यता आहे.