तेलंगणासाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी

0
9

तेलंगणा राज्याच्या विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. अशातच भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणेच तेलंगणातही तीन खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपने काल दि. 22 रोजी 52 उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. तेव्हा ही नावे निश्चित करण्यात आली.