तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेऊन तेलंगणला विशेष राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी केली. तसेच कर सवलत देण्याचीही मागणी त्यांनी केली. दरम्यान, आंध्र प्रदेश राज्यानेही विशेष दर्जा मागितला आहे. त्यांना तो देऊ नये असा ठराव तेलंगण विधानसभेत संमत करण्यात आला आहे.