तेजसद्वारे गोवा किनारपट्टीवरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
13

भारतीय हवाई दलाच्या एलएस तेजस या लढाऊ विमानाने गोवा किनारपट्टीजवळच्या समुद्रात स्वदेशी बनावटीच्या अस्त्र बियॉन्ड व्हिज्युअल रेंजच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. विमानातून हे क्षेपणास्त्र सोडण्यात यश आले. सुमारे 20,000 फूट उंचीवर या विमानातून क्षेपणास्त्र सोडण्यात यश मिळाले. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण करणारे हे एक परिपूर्ण उदाहरण ठरले.

चाचणी प्रक्षेपणाचे परीक्षण एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी , संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि सेंटर फॉर मिलिटरी एअरवॉर्थिनेस अँड सर्टिफिकेशन आणि महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. या विमानाचे परीक्षण देखरेख करणाऱ्या दुसऱ्या एका तेजस ट्वीन सीटर विमानानेही केले.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तेजस-एलसीएवरून क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल सर्वांचे कौतुक केले आहे. प्रक्षेपणामुळे तेजसच्या लढाऊ पराक्रमात लक्षणीय वाढ होईल आणि आयात केलेल्या शस्त्रांवरील अवलंबित्व कमी होईल, असे संरक्षणमंत्री सिंह यांनी म्हटले आहे.