आपल्या एका सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्यावरील खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हापसा येथील कनिष्ठ न्यायालयाला ३१ मार्च २०२१ पर्यंतची मुदत दिली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत दिली होती.
या खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यास वेळ वाढवून द्यावी अशी संबंधित न्यायालयाने मागणी केली होती. आहेत.